Rojgar Melawa
bb विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याकरीता तसेच विविध क्षेत्रात निर्माण होत असलेल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याचे दृष्टिने कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, अमरावती, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग व विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ यांचे संयुक्त विद्यमाने पंडीत दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दिनांक ११.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. के. जी. देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे करण्यात आलेले आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक विद्यार्थांनी ऑनलाईन apply करावे. ऑनलाईन apply करण्यासाठी सोबत दिलेल्या pdf मधील सात स्टेप फॉलो करून ऑनलाईन नोंदणी करावी व इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने शैक्षणिक पात्रतेच्या आवश्यक कागदपत्रासह दिनांक ११.०२.२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता डॉ. के. जी. देशमुख सभागृह, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथे उपस्थित राहावे. आवश्यक कागदपत्र : ऑनलाईन सेवा योजना कार्ड, निवडणुक ओळखपत्र/आधारकार्ड, प्रमाणपत्राच्या प्रती, २ पासपोर्ट फोटो, स्वतः चा बायोडाटा व इतर आवश्यक साहित्य येताना सोबत आणावे. अधिक माहितीसाठी संपर्क : डॉ. प्रविण सरपाते सहायक प्राध्यापक, संगणकशास्त्र विभाग, गो. सि. गांवडे महाविद्यालय उमरखेड 9762239818 9284253136
Notice Date :08-02-2023