YAVATMAL ZILHA AKHIL KUNBI SAMAJ's

GOPIKABAI SITARAM GAWANDE MAHAVIDYALAYA

UMARKHED Dist. Yavatmal 445206 (INDIA)
NAAC Reaccredited Grade B++ CGPA 2.79 (3rdcycle) | | Affiliated to Sant Gadge Baba Amravati University

Department of Marathi & Marathi Literature
Extension Activity

Extension Activity :-

     नॅकच्या आंतरिक गुणवत्ता शाश्वती समितीच्या (IQAC) एक्सटेंशन उपक्रमांतर्गत एक अभिनव उपक्रम राबवताना दि. ८ फेब्रुवारी २०१९ रोजी गो. सी. गावंडे महाविद्यालय, उमरखेडच्या एम. ए. प्रथम वर्ष, मराठीचे विद्यार्थी अतुल वानखेडे, अमोल राठोड, आणि बी. ए. तृतीय वर्षाच्या मनिषा धोंगडे, कोमल रोकडे यांनी एम. ए. प्रथम वर्षाचे विद्यार्थी गणेश दुधे, सौरभ रंधे यांच्या सहकार्याने महात्मा जोतिबा फुले विद्यालय, उमरखेड येथे इयत्ता आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना निबंध, पत्रलेखन, कविता व लेखनविषयक नियम यांचे पूर्व तयारी करून, महाविद्यालयात सराव पाठ घेऊन अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी वर्ग नियंत्रण छान ठेवून एक-एक तासिका घेतली. निश्चितच त्यांच्यासाठी हा एक वेगळा अनुभव होता. गो. सी. गावंडे महाविद्यालयाचे (माजी) प्राचार्य मा. डाॅ. एम. एन. गायकवाड, महात्मा जोतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. श्री. प्रमोद देशमुख सर आणि विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी वृंदांचे सहकार्य या उपक्रमासाठी लाभले. गावंडे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख प्रा. अभय जोशी यांच्या मार्गदर्शनात प्रा. डाॅ. व्ही. आर. जीवतोडे सर व प्रा. ए. जे. सूर्यवंशी सर यांनी हा उपक्रम राबविण्यासाठी परिश्रम घेतले.

https://drive.google.com/file/d/1bpnm788r681geBwVY9N6XAINV2Nj7Cm8/view?usp=share_link

 

Extension Activity :- 

 

   नॅकच्या आंतरिक गुणवत्ता शाश्वती समितीच्या (IQAC) एक्सटेन्शन उपक्रमांतर्गत एक अभिनव उपक्रम राबवताना दि. ६ मार्च २०२० रोजी उमरखेड येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना मराठीच्या पाठ्यपुस्तकातील विविध घटकांचे अध्यापन केले. 
    एम.ए. भाग २ मराठीचे विद्यार्थी कु. वर्षा पेंडलवाड, कु. अपूर्वा लाखणे, कु. कांचन बहादुरे, कु. शिल्पा धुळे, अतुल वानखेडे, अमोल राठोड आणि बी. कॉम. भाग ०३ ची विद्यार्थिनी कु. आरती कटके व कु‌. श्वेता कुंटे यांनी या एक्स्टेंशन उपक्रमात सहभाग घेतला. त्यांना एम. ए. मराठीचे विद्यार्थी सौरभ रंधे, गणेश दुधे, युवराज पवार, आणि एम. कॉम. चा विद्यार्थी वैभव रंधे यांनी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
      मराठी भाग प्रमुख प्रा. अभय जोशी यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. आयक्युएसी समन्वयक प्रा. डॉ. के. डी. बोंपिलवार आणि प्राचार्य डॉ. एस. आर. वद्राबादे यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात आला.
     अभिनव उपक्रम राबविण्यात नेहमीच पुढाकार घेणारे महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रमोद देशमुख आणि महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयातील सर्व सहकारी उत्साही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सक्रिय सहकार्याने हा अभिनव एक्स्टेंशन उपक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.
 
या उपक्रमाचे काही फोटो
व वर्तमानपत्रातील प्रसिद्धी... Link 
 
1) https://drive.google.com/file/d/1HHi4mtLk26yTclUliJnHHXZ5sKHv-Hbs/view?usp=share_link
 
2) https://drive.google.com/file/d/1eBtPHD7Ljaftg22TvD3QR7_36FOZGKnt/view?usp=share_link
 
3) https://drive.google.com/file/d/1AKYiFk4ruMjj5g_NLtNwjpvgYbLGVrky/view?usp=share_link
 
4) https://drive.google.com/file/d/1ikke5yrvr0pmRCkatiuC08_tcpho6RaY/view?usp=share_link
 
5) https://drive.google.com/file/d/1l7eUMiTBbRYUIm67LC7nb-1q-FJXsKbs/view?usp=share_link
 
6) https://drive.google.com/file/d/1Tt8gWZ1NwT8VPvQOoT6gQ9dbQ5qcrPHj/view?usp=share_link

News & Notice

Links & Downloads